Sunday, 11 October 2015

           मुलाखत - धर्मवीर पासमान 

 आज चा दिवस पुन्हा काहीतरी नवीन शिकवून गेला . मी आणि माझा मित्र अविनाश बॅण्डस्टेण्ड फिरायला गेलो होतो .बॅण्डस्टेण्डला किनारपट्टीवर आम्हाला एक माणूस भेटला . त्या माणसाने आम्हाला या परिसरात गायक ,गायिका कुठे राहतात हे विचारल ?ते म्हणाले कि बिहार शहरातून मुंबईत फक्त गाण्याची एखादी संधी मिळावी या साठी ते आले .  त्यांच्याकडे गाण्याची कला आहे . आपल्यातील कलेने ते सोनू निगम ,लता मंगेशकर यांच्यापेक्षाही पुढे जाऊ शकतात असा विश्वास आहे . त्याचप्रमाणे गायन सोडून दुसरया कोणत्याही प्रकारे त्यांना पैसा मिळवायचा नाही . घरातील लहान मुलगा आहे  ,त्याला  आईशिवाय वाढवायचं आहे . घरात कधीकधी दोन वेळेच जेवण मिळत नाही ,तरीसुद्धा आपल्यातील कलेने ते नककीच यशस्वी होतील असा विश्वास आहे . देवळात गायनाला त्यांनी सुरवात केली होती . आता मुंबईत त्यांना स्वत:ला  सिद्ध करण्याची एक संधी हवी आहे . धर्मवीर पासामान यांच्याशी बोलून एक गोष्ट लक्षात आली कि हा माणूस एवढी हलाखीची परिस्तिथी असतानादेखील स्वत:तील जिदद मरू देत नाही . मग आपण आपल्या पत्रकारितेची आवड इतक्या लवकर कशी विसरून जाऊ शकतो .







    

No comments:

Post a Comment