' घुशीची मुलाखत '
आतापर्यंत अभ्यासादरम्यान वेगवेगळ्या व्यक्तींच्या मुलाखती
घेण्याचा प्रयत्न मी केला . पहिल्यांदाच एखादया प्राण्याची मुलाखत घेण्याची संधी
मला मिळाली . त्यामुळे हे काम करण्याचे मी ठरवले ,त्यानंतर पप्पांना सांगून बाजारातून एक पिंजरा घरी आणला . त्यात घुशीला पकडणे थोडे अवघड होते . म्हणून पप्पांनी पिंजऱ्याला केळ्याची फोड अडकवली .घूस मात्र केळ्याच्या फोडीने पिंजऱ्यात आली नाही . त्यानंतर माझ्या बाजूच्या ताईने एक युक्ती केली . ताईने पिंजऱ्याच्या आत चकली अडकवली ,त्यानंतर १५ मिनिटात घूस पिंजऱ्यात आली आणि फसली . त्यानंतर रात्री मी घुसीशी बोलण्याचा प्रयत्न केला ,पण रात्री घूस अंगावर येत असल्यामुळे मी घाबरलो आणि ठरवल की घुसिशी सकाळीच बोललेल बर . त्यानंतर सकाळीच उठून पिंजऱ्यापाशी पोहचलो . त्यानंतर झाडूचे हिर घेतले . आणि त्या हिरांनी घुशीला टोचले . थोडा वेळ घुसीशी बोलण्याचा प्रयत्न केला . त्यासाठी चिव -चिव ,चिव -चिव या आवाजात घुशीला प्रश्न विचारात होतो . त्यानंतर घूस जसजशी आपल्या तोंडावर पायाने हात फिरवत होती ,मीही त्याचप्रकारे माझ्या हाताने माझ्या तोंडावर हात फिरवला. कधी घूस मला घाबरवायची ,तर कधी मी तिला घाबरवायचो . हा खेळ चालूच होता ,काही वेळाने मी घुसीशी हळुवारपणे तिच्या भाषेत संवाद साधत होतो ,त्याप्रमाणे तीही एकदम
सहजपणे माझ्याकडे बघत होती . त्यानंतर गेक गोष्ट मात्र समजली की मुलाखतीसाठी भाषेची गरज नसते .
No comments:
Post a Comment