छक्का. छक्का हा शब्द आपण जास्तवेळा वापरत नाही ,त्याएवजी 'तृर्तीयपंथी 'शब्द वापरला जातो . मात्र 'तृतीयपंथी' शब्दातून आपल्या सर्वांचे तेवढेसे समाधान होत नाही. त्यामुळे रेल्वे मध्ये प्रवास करताना किंवा घराबाहेर एखादा तृतीयपंथी आला असेल ,तर 'छक्का'आला किंवा 'छक्के' आले असे आपण संभोदतो . यालाच अनुसरून माझ्या आयुष्यातील एक छोटासा प्रसंग मी आपल्याशी शेअर करत आहे .बहुतेक तृतीयपंथीयांना रोजगाराचे साधन नसते . त्यामुळे उदारर्निर्वाहासाठी लोकांच्या घरोघरी जाऊन पैसे किंवा मदत मागणे नाहीतर रेल्वे मध्ये जाऊन लोकांकडे उदारर्निर्वाहासाठी विनवणी करणे हाच उपाय त्यांच्यासमोर असतो . काही दिवसांपूर्वी मी रेल्वेतील 'लेडीज लगेज ' या डब्ब्यामधून मधून प्रवास करत होतो . त्यावेळी दरवाजासमोर उभे असतेवेळी दोन 'तृतीयपंथी' माझ्यासमोर येउन बसले . त्यातील एकाचा चुकून मला पाय लागला . मी लगेचच त्या तृतीयपंथ्या कडे बघितलं,त्यावेळी समोरच्या तृतीयपंथ्याने हास्याच्या स्वरुपात प्रतिसाद दिला . मात्र माझ्या तोंडावर कोणतीच भावना नव्हती . काही काळानंतर पुन्हा तशाप्रकारेच मला त्या तृतीयपंथ्याचा स्पर्श झाला .यावेळी तिरस्काराच्या नजरेने मी त्या तृतीयपंथ्याकडे बघितले ,परंतु त्या तृतीयपंथ्याच्या चेहऱ्यावर फक्त हसू होते . अप्रत्यक्षपणे तो तृतीयपंथी माफी मागत होता . त्यानंतर मी जेव्हा विलेपार्ले स्टेशन वर उतरायला निघालो तेव्हा ही तो तृतीयपंथी माझ्याकडे पाहून हसतच होता , मात्र माझ्याकडून कुठलेही हावभाव नव्हते . तो तृतीयपंथी माझ्यासोबत एक' 'सामान्य माणूस ' म्हणून वागू पाहत होता . यावेळी माझ्याकडून मिळालेल्या या तिरस्काराच्या उत्तराने कदाचित आपण सामान्य माणूस म्हणून कधीच वावरू शकणार नाही ,हा न्यूनगंड त्या तृतीयपंथ्याच्या मनात कायमस्वरूपी तयार झाला असेल .
No comments:
Post a Comment