' वकिली म्हणजे मास्क्या मारण नव्हे '
वकिली म्हणजे मास्क्या मारण नव्हे? काही दिवसांपूर्वी हाच प्रश्न माझ्या डोक्यात सतावत होता . खूप लोकांकडून ऐकले होते कि वकिली म्हणजे मास्क्या मारण्या एवढ सोप नसत ,त्यावेळी विचार केला अस नेमक का असाव? त्यासाठीच मी एका वकिलांशी गाठ -भेट केली आणि त्यांच्याशी छोटासा संवाद साधला ,तो आपल्याशी आज मी शेअर करत आहे. 'अरुण दामू आव्हाड' या वकिलांची शिवडी कोर्टात माझी भेट झाली . कल्याण ते शिवडी हा त्यांचा डेली प्रवास . लहानपणापासूनच भ्रष्टाचार आणि अन्याय मिटवणे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यांनी वकिली क्षेत्र निवडले . अंदाजे एल . एल . बी . झाल्यानंतर दोन वर्षांनी त्यांनी शिवडी कोर्टात 'वकील'म्हणून सुरवात केली . याच कोर्टात आपल्या आयुष्यातील पहिली 'चेक बाउंस 'ची केस ते लढले . त्यानंतर आतापर्यंत अंदाजे दिवसाला ७-८ चेक बाउंस केसेस ते लढतात . ११-६ आणि २:४५ -६ या दोन सेशन मध्ये खूप साऱ्या चेक बाउंस च्या ,सायबर क्राइम च्या केसेस कोर्टात येतात . यावेळी वकिलाला आपल्या क्लायंटला योग्य सिध्द करण्यासाठी' भाषेवर प्रभुत्व असणे 'आवश्यक ठरते . गुन्ह्याच्या संबंधित सर्व कागदपत्रे ,पुरावे कोर्टात सादर केले जातात . काही वेळा पुराव्याअभावी आपल्या क्लायंटला शिक्षा होते,अप्रत्यक्षपणे आपली कमतरता त्या ठिकाणी दिसून येते . यावेळी आधी क्लायंटला धीर दिला जातो . त्यानंतर केस एम . एम . कोर्टात ,सेशन कोर्टात ,हाय कोर्ट आणी सुप्रीम कोर्टात लढली जाते . अरुणजी म्हणतात केस लढताना डेरिंग ,न्यायाधीशांच्या समोर बोलण्याचे तंत्र , आपली कमजोर बाजू या गोष्टींचा नीट अभ्यास करावा लागतो . प्रत्येक वकिलाकडे चेहरा ओळखण्याचे चातुर्य असावे लागते ,आपला क्लायंट त्या पात्रतेचा आहे का याची शहानिशा करूनच केस हाती घ्यावी लागते . आपल्या क्लायंटला लोक जरी 'चोर 'म्हणून पाहत असतील ,तरीही आम्हाला त्या व्यक्तीकडे 'एक सामान्य माणूस म्हणूनच पाहावे लागते '.अरुणजी म्हणतात अनुभवांमुळेच माझ्यातील वकील अधिक विकसित होत गेला , डेरिंग वाढली . सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मला माझ्या कामातून अधिकाधिक समाधान मिळत गेल . कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी 'घरातल्या व्यक्तींचा पाठिंबा 'महत्वाचा असतो ,मला तो नेहमीच मिळत राहिला . खंत एकाच गोष्टीची वाटते कि काही वकिलांच्या भ्रष्टाचारी प्रवृत्तीमुळे ,सर्वच वकिलांना भ्रष्ट संभोदले जाते .
ᐉ Casino Site | Bonuses | Best Online Casino
ReplyDeletecasino site | Bonuses | Best Online Casino Bonuses casino site 샌즈카지노 | Bonuses 제왕카지노 | Best Online Casino Bonuses choegocasino online casino site.