' माया '
माया हा शब्द बहुतेककरून आपण एखाद्या स्त्रीचे नाव या अर्थाने पहिला असेल . मात्र माया या शब्दाचा एक वेगळा अर्थ मला पुढील अनुभवातून समजला . रोजच्या प्रमाणे मी माझा क्लास संपवून रात्री ९ वाजता घरी येत होतो . मी हायवे ला थोडा वेळ थांबलो, त्यानंतर सुसाट वेगात बाईक चालवण्याच्या नादात माझं पॉकेट कसबस माझ्या चैन तुटलेल्या खिश्यात ठेवल . माझं पॉकेट अर्धवट बाहेर आलं होत तरीही मी निष्काळजीपणे सुसाट वेगात बाईक चालवत होतो . रस्त्यात एका माणसाच्या ओरडण्याचा आवाज माझ्या कानी ऐकू आला ,मी मात्र त्या आवाजाकडे दुर्लक्ष करत पुढे निघून गेलो . काही काळानंतर मी माझ्या घराजवळ पोहचलो ,त्यावेळी केळी विकत घेण्यासाठी पॉकेट मध्ये हात टाकला ,तर पाहतो तर काय पॉकेट गायब . माझ्या तोंडावर घबराटाच वातावरण तयार झालं ,बॅगेचा कोपराण-कोपरा शोधाल ,पॉकेट काही सापडलं नाही . तेवढ्यात अचानक माझ्या मोबाइल वर एक कॉल आला ,अपरिचित नंबर पाहिल्यामुळे आधी थोडीशी भीती तर वाटली ,मात्र समोरच्या व्यक्तीने डायरेक्ट आप का नाम क्या हैं हा प्रश्न विचारला?त्यावेळी थोडा राग आला नंतर तो माणूस म्हणाला ' आप अभी कहा पे हो 'तेव्हा माझ्या डोक्यात ट्यूब पेटली . मी त्यांना विचारले आपको कोई पॉकेट मिला हैं क्या ?त्या वेळी त्यांनी होकाराथी उत्तर दिले . मी त्या व्यक्तीला त्या ठिकाणीच थांबायला सांगितले . काही वेळाने मी पॉकेट पडले होते त्या ठिकाणी पोहचलो आणि त्या व्यक्तीला भेटलो ,त्यांचे आभार मानले
त्यांना मी एक प्रश्न विचारला की सरजी आजकल की दुनिया मे कोई किसी इनसान कि मदत नही करता फिर आप ने मेरी मदत क्यू की ?तेव्हा त्या व्यक्तीने अत्यंत प्रेरणादायी उत्तर दिले की ,'दोस्त ये हमारा इन्सानि शरीर एक माया हैं ,इस माया को जितनी जरुरत है ,उससे ज्यादा मुझे किसी भी चीज की जरुरत नही.इसिलिये मेने आपको आपका पॉकेट वापिस कर दिया . हे उत्तर ऐकून 'माया' या शब्दाचा खरा अर्थ मला त्या दिवशी समजला .
No comments:
Post a Comment