Wednesday, 24 August 2016

    बातमी 

मुंबईच्या लोकलसमध्ये मच्छीवाल्यांची हुकूमशाही 

माल डब्ब्यांमध्ये बायकांचा धुडगूस ,महाविद्यालयीन विद्यार्थाना त्रास 

मुंबई :प्रतिनिधी 
          महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लोकलचा प्रवास अतिशय त्रासदायक ठरत आहे . "सकाळी महाविद्यालयात जाण्याची घाई ,त्यात मूंबईतील लोकल्सची प्रचंड गर्दी " हा ताप कमी म्हणून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लोकल्समधील माल डब्ब्यांमध्ये मच्छिवाल्यांच्या भांडणाला सामोरे जावे लागते . रेल्वे कायद्यातील तरतुदीनुसार सकाळी ६ ते दुपारी १ या कालावधीत  स्त्रियांना आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या डब्ब्यात प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे ,मात्र काही मच्छिमार बायका या सुविधेचा दुरुपयोग करून घेताना आढळतात . 'माल डब्बा 'फक्त मच्छिवाल्यांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे ,हा गैरसमज त्यांच्या मनात तयार झाला आहे . 
                एका सर्वेच्या निदर्शनातून हे लक्षात आले कि ,माल डब्ब्यात गर्दीच्या वेळी आत शिरू पाहणाऱ्या स्त्रियांना देखील धक्काबुक्की केली जाते ,त्यांच्या विषयी अपशब्द वापरले जातात .महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना काही वेळा दरवाजाच्या बाहेर ढकलले जाते ,यात एखादा अपघात होण्याची दाट शक्यता असते . सकाळच्या गर्दीतून प्रत्येक जण घाईत असतो ,स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याच नुकसान करणे हे कितपत योग्य आहे ?कुठेतरी माणसातील माणूसकी हरपून चालली आहे का हा मोठा प्रश्न आपल्या सर्वांसमोर आहे .  







No comments:

Post a Comment