Thursday, 1 September 2016

                              मुलाखत -एखाद्या विषयात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तीची मुलाखत 

 एखाद्या विषयात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तीची मुलाखत हा विषय मला अभ्यासादरम्यान हाताळायला मिळाला ,पण उल्लेखनीय कामगिरी म्हणजे नेमक काय हाच प्रश्न एकसारखा मनात येत होता .इंटरनेट वर सर्च करूनही बघितलं मात्र त्यातूनदेखील काहीच निष्पन्न झालं नाही . काही दिवस विषयाच्या शोधात असताना डोक्यात एक विचार प्रगटला . माझे स्केटिंग सर,त्यांनादेखील 'स्केटिंग ' या विषयावर भरपूर नॉलेज आहे ,आज सरांनी ज्या मुलांना स्केटिंग शिकवली ती मुले गोल्ड "मेडल मेडलिस्ट ,सिल्वर मेडलिस्ट" आहेत , 'स्केटिंग' या खेळात मुंबईच ,महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करताहेत . त्यामुळे मुलांना 'विनर बनवणारे' सर स्वतः देखील स्केटिंग या खेळातील 'तज्ञ् 'आहेत 
 'सुशांत परमेकर',स्केटिंग या खेळातील आघाडीचे व्यक्तिमत्व ,लहानपणापासूनच सुशांत आणि त्यांचे मोठे भाऊ 'भूपेश 'यांना स्केटिंग खेळाची आवड होती ,त्यांचा जन्म १९८४चा , ३० वर्षांपूर्वी 'स्केटिंग' खेळ भारतात नवीनच होता ,फारशी लोकप्रियता नव्हती ,सुशांत आणि भूपेश यांनी जिद्दीने स्केटिंग शिकायला सुरवात केली ,सराव करत असतानाच काही स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेतला ,दोघांनीही 'स्टेट लेवलपर्यंत 'मजल मारली,वयाच्या १७व्या वर्षी  सुशांत सरानी 'स्केटिंग प्रशिक्षक म्हणून सुरवात केली . सुरवातीचा काही काळ अवघड होता ,त्यावेळेच्या नावाजलेल्या स्केटिंग प्रशिक्षकांकडे 'सहाय्यक प्रशिक्षक 'म्हणून प्रशिक्षणाचे धडे घेतले .हळूहळू गाडी रुळावर यायला लागली आणि १९९८ साली 'सुशांत आणि भूपेश 'यांनी "टीम स्पीड इंटरनॅशनल "नावाने स्वतः ची स्केटिंग अकॅडमी सुरु केली ,काम मोठं होत ,स्वतः ला सिध्द करायचं होत ,कठीण परिस्थितीशी सामना करत मुलांना प्रशिक्षण देणं सुरु ठेवल ,आपल्या न्यू टेक्निक्स ,सादरीकरणाच्या जोरावर मुलांमध्ये आत्मविश्वास उभा केला ,त्यांना डिस्ट्रिक्ट ,स्टेट लेवलला पोहोचवलं . 'मुलांमध्ये सुधारणा करायची असेल तर आधी मला स्वतःला नवनवीन टेक्निक्स शिकायला हव्यात' हे त्यांचं ब्रीदवाक्य . स्केटिंग क्षेत्रातील महत्वाची पायरी 'इनलाइन सर्टिफिकेशन प्रोग्राम '(आय.सी.पी .),यशस्वीपणे  पार केली .फलस्वरूप म्हणून २०१२ साली 'कबीर' नावाचा स्केटर 'नॅशनल लेवलला 'प्रथम आला .खऱ्याअर्थाने कष्टाचे ,मेहनतीचे 'चीज' झाले . आज 'टीम स्पीड इंटरनॅशन' भारतातील एक अग्रेसर 'स्केटिंग अकॅडमी 'आहे ,स्वतःला अजून विकसित करण्याचा प्रयत्न 'टीम स्पीड इंटरनॅशनल ' करत आहे . 

      

             

No comments:

Post a Comment